सकाळ डिजिटल टीम
पाकिस्तान, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिके या देशांदरम्यान पाकिस्तानमध्ये त्रिदेशीय मालिका सुरू आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने विक्रमी कामगिरी केली.
त्याने या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.
त्याने सर्वाधिक जलद ६००० वन-डे धावा करण्याचा विक्रम करत हाशीम आमलाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सर्वाधिक जलद ६००० वन-डे धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम आमला व पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम यांनी १२३ सामन्यांत जलद ६००० धावांचा टप्पा गाठला आहे.
भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने १३६ सामन्यांत ६००० धावा केल्या व तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
१३९ सामन्यांत ६००० धावा पूर्ण करणारा न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही १३९ सामन्यांत ६००० धावा पूर्ण केल्या व यादीत दुसरे चौथ्या स्थानावर आहे.