सकाळ डिजिटल टीम
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने आयपीएल २०२५ हंगामात कर्णधारपदी 'रजत पाटीदार'ची निवड केली.
२०२२ ते २०२४ हंगामांत कर्णधार असलेल्या फॅफ ड्यूप्लेसिसला लिलावापूर्वी आरसीबीने रिलिज केले.
फॅफ ड्यूप्लेसिसला रिलिज केल्यानंतर विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होईल असे वाटले होते.
पण माजी कर्णधार विराट कोहलीकडून कर्णधार म्हणून रजत पटीदारच्या नावाची घोषणा करण्यात आली.
रजत पाटीदारने २०२१ च्या हंगामात आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
हंगामातील खराब कामगिरीमुळे त्याला २०२२ मध्ये संघातून रिलिज करण्यात आले व तो त्या हंगामात अनसोल्ड राहिला.
पण, लवनीथ सिसोदियाला दुखापत झाल्यानंतर त्याच्या बदली रजतला संघात घेतले गेले.
त्याने त्या हंगामात ४९ चेंडूत ११२ धावांची शतकी खेळी केली व आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.
२०२३ मध्ये त्याला आरसीबीकडून रिटेन करण्यात आले व त्याने या त्या हंगामात उल्लेखनीय व सात्त्यपूर्ण कामगिरी केली.
आणि आज २०२५ हंगामात रजत RCB संघाचा कर्णधार झाला.