Monika Shinde
१९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सकाळी ८ वाजता मुंबई–मद्रास मेलने सोलापुरात दाखल झाले.
सोलापूर म्युनिसिपल जिल्हा लोक बोर्डाच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेतील कै. रा. ब. मुळे सभागृहात डॉ. बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले.
मानपत्र समारंभानंतर बाबासाहेबांनी बॅकवर्ड हॉस्टेलला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
बॅकवर्ड हॉस्टेलजवळ मोकळ्या मैदानात त्यांनी हजारो नागरिकांसमोर भाषण केलं.
याच दौऱ्यात स्त्री शिक्षक व विद्यार्थिनींसाठी खास मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाबासाहेबांनी विशेष मार्गदर्शन केलं.
१४ जानेवारी १९४६ साली बाबासाहेब आल्याची बातमी समजताच सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती.
हा दौरा सोलापुरातील सामाजिक आणि शैक्षणिक जागृतीचा ऐतिहासिक क्षण ठरला. बाबासाहेबांचं सोलापुरातील योगदान आजही स्मरणात आहे.
ही माहिती ‘सोलापूर सकाळ टुडे’ या स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीतून घेण्यात आली आहे.