बाबासाहेब आंबेडकर अन् प्रबोधनकार ठाकरेंमुळे महाराष्ट्रात सुरु झाला नवरात्रौत्सव...

Shubham Banubakode

बाबासाहेबांना आमंत्रण...

1927 साली दादर येथील सार्वजनिक गणेशोत्सवात बाबासाहेब आंबेडकरांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, उच्चवर्णीयांनी त्यांना विरोध केला.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

गणेशोत्सवाची सुरुवात

1894-95 च्या हिंदू-मुस्लीम दंगलींच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले. पण त्याची सूत्रे उच्चवर्णीयांकडे राहिली.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

बाबासाहेबांचे बंड

उच्चवर्णीयांच्या भेदभावाविरोधात बाबासाहेबांनी बंड पुकारले. यात त्यांना प्रबोधनकार ठाकरे आणि रावबहादूर सीताराम केशव बोले यांचा पाठिंबा मिळाला.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

प्रबोधनकारांची धमकी

प्रबोधनकारांनी धमकी दिली की ,जर अस्पृश्य असलेल्या हिंदूंना दुपारी ३ वाजेपर्यंत गणेशमूर्तीची पूजा करण्याची संधी दिली नाही, तर ते मूर्ती नष्ट करतील.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

बाबासाहेब अन् प्रबोधनकारांवर आरोप

उच्च वर्णीयांसाठी दलितांचे हे बंड मोठा धक्का होता. त्यामुळे हा उत्सव पुन्हा कधी साजरा करणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर उत्सव बंद पाडल्याचे आरोप झाले.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

नवरात्रौत्सवाची सुरुवात

ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रबोधनकार, बोले आणि इतरांनी नवरात्रौत्सव लोकसण म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यात शिवरायांची कुलदेवता तुळजापूरची भवानी माता केंद्रस्थानी होती.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

आजही सुरु आहे परंपरा

‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून दादर येथे ‘शिव भवानी नवरात्री महोत्सव’ सुरू झाला. दलित आणि ब्राह्मणेतरांचा मोठा सहभाग होता. ही परंपरा आजही दादर पश्चिमेतील खांडके बिल्डिंगमध्ये साजरी होते.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

संदर्भ

आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेबांवरील त्यांच्या दुसऱ्या खंडात (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड २) याचा उल्लेख केला आहे.

Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray started Navratri Utsav in Maharashtra

|

esakal

इथे आहे शिवरायांच्या सख्ख्या चुलत्यांसह भोसले घराण्यातील तिघांची समाधी...

Shivaji Maharaj

|

esakal

हेही वाचा -