Shubham Banubakode
अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेले राशीन हे गाव मध्ययुगाशी संबंधित आहे. राष्ट्रकूट राजांच्या ताम्रपटांमध्ये 'भुक्ती' असा उल्लेख असलेलं गाव आजही वैभवशाली वारसा जपते आहे.
राशीन गावाचं प्रमुख आकर्षण जगदंबा (यमाई) मंदिर, हे मंदिर पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर हेमाडपंथी शिलालेखांनी समृद्ध आहे.
मंदिराच्या प्रांगणाबाहेर तीन मोठ्या समाधी आहेत, ज्या छत्रपती भोसले घराण्यातील शरीफजी भोसले, त्यांचे पुत्र त्रिंबकजी आणि त्यांच्या पत्नींची आहे. शरीफजी हे छत्रपती शिवराजांच्या सख्ये चुलत भाऊ होते.
गावाच्या मध्यभागी वसलेली काळे देशमुखांची गढी अर्धा एकरावर पसरली आहे. ही गढी २५ फुट उंच तटबंदी दगड आणि विटांनी बांधलेली असून, बंदुकीच्या मारासाठी जंग्या आहेत.
गावाभोवती वसलेला प्राचीन नगरकोट आता पूर्णपणे नष्ट झाला असून, केवळ दोन बुरुज शिल्लक आहेत. हे अवशेष राशीनच्या संरक्षण व्यवस्थेची साक्ष देतात.
मंदिर तीन भागांत विभागलेले आहे. तटाला लागून चारही बाजूंनी ओवऱ्या आहेत. मुख्य दरवाजाजवळ भला मोठा नगारखाना असून, दोन दीपमाळा दसऱ्याच्या दिवशी हलवल्या जातात.
मोगल काळात राशीनची पाटीलकी भोसले घराण्याकडे होती. औरंगजेबाने जवळच 'औरंगपुर' पेठ बसवली. इ.स. १७५८ मध्ये पेशव्यांनी अहमदनगर किल्ला जिंकला, तेव्हा राशीन हे सरदार कविजंगांचे जहागिरी गाव होते. यामुळे आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.