बाळकृष्ण मधाळे
निसर्गातील औषधी गुणांनी परिपूर्ण असलेले बाभूळ (बाभळीचे झाड) आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या झाडाच्या शेंगा, साल, डिंक आणि पाने औषधी गुणांनी समृद्ध आहेत.
Babool Pods Benefits
esakal
बाभळीच्या शेंगांचा काढा गुळण्या करण्यासाठी उपयोगी असून घसादुखी व कोरड्या खोकल्यात आराम देतो.
Babool Pods Benefits
esakal
दातून केल्याने दात मजबूत होतात, सूज व रक्तस्त्राव कमी होतो आणि तोंडाचा वास जातो.
Babool Pods Benefits
esakal
शेंगांची पावडर अतिसार, गॅस व अपचनात उपयोगी ठरते.
Babool Pods Benefits
esakal
त्वचारोगांमध्ये शेंगांची पेस्ट किंवा काढा फोड, खाज यावर लावला जातो. तसेच मूत्रमार्गातील जळजळ व संसर्ग कमी करण्यास मदत होते.
Babool Pods Benefits
esakal
आयुर्वेदानुसार, पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठीही शेंगा उपयुक्त मानल्या जातात.
Babool Pods Benefits
esakal
ग्रामीण भागात बाभळीच्या शेंगांची भाजी केली जाते. विशेषतः राजस्थानमध्ये हा पारंपरिक पदार्थ लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात या शेंगा उपलब्ध होतात आणि पूर्वी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे.
Babool Pods Benefits
esakal
राजस्थानसह अनेक ठिकाणी बाभळीला पवित्र वृक्ष मानले जाते. घराजवळ लावणे शुभ समजले जाते. बाभळीचे लाकूड व काटे शनिदेवाच्या पूजेत वापरले जातात. तसेच काही धार्मिक विधींमध्ये त्याचे लाकूड हवनासाठी आणि ताबीज म्हणूनही वापरले जाते.
Babool Pods Benefits
esakal
वरील माहिती पारंपरिक आयुर्वेदिक मान्यतेवर आधारित आहे. कोणताही औषधी उपयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Babool Pods Benefits
esakal
Why Bats Hang Upside Down
esakal