बाळकृष्ण मधाळे
तुम्ही कधी तरी वटवाघळे झाडांच्या फांद्यांवर, गुहांमध्ये किंवा घरांच्या अंधाऱ्या कोपऱ्यांत उलटे लटकलेली पाहिली असतील; पण वटवाघळे नेहमीच उलटी का लटकतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला, आज यामागचं शास्त्रीय कारण समजून घेऊया.
Why Bats Hang Upside Down
esakal
वटवाघळे उडू शकतात, मात्र ते पक्षी नसून सस्तन प्राणी आहेत. त्यामुळे त्यांच्या पंखांची रचना पक्ष्यांच्या पंखांसारखी मजबूत नसते. याच कारणामुळे वटवाघळांना जमिनीवरून थेट उड्डाण घेणे शक्य होत नाही.
Why Bats Hang Upside Down
esakal
उलटे लटकून राहिल्यामुळे वटवाघळांना उडण्यासाठी मोठा फायदा होतो. एखाद्या उंच जागेवरून खाली झेप घेतली की गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ते सहजपणे पंख पसरून उडू शकतात. ही पद्धत त्यांच्यासाठी अत्यंत सोपी आणि ऊर्जा वाचवणारी असते.
Why Bats Hang Upside Down
esakal
तसेच, झाडांच्या फांद्यांवर, गुहांमध्ये किंवा अंधाऱ्या जागी उलटे लटकल्यामुळे वटवाघळे आपल्या शत्रूंपासून सुरक्षित राहू शकतात. अनेक भक्षक प्राणी अशा ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे वटवाघळांना संरक्षण मिळते.
Why Bats Hang Upside Down
esakal
वटवाघळांच्या शरीररचनेतही यासाठी खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या पायांची बोटे आणि नखे अशी बनलेली असतात की एकदा एखाद्या फांदीला धरले की त्यांना वेगळा जोर लावावा लागत नाही. शरीराचं वजनच नखांना घट्ट पकड मिळवून देतं, त्यामुळे ते सहज आणि सुरक्षितपणे लटकू शकतात.
Why Bats Hang Upside Down
esakal
दिवसा विश्रांती घेताना किंवा झोपताना उलटे लटकणे हा वटवाघळांसाठी सर्वात सुरक्षित आणि सोयीचा मार्ग आहे. उडायचं झालं की ते फक्त खाली झेप घेतात, पंख पसरतात आणि आकाशात भरारी घेतात.
Why Bats Hang Upside Down
esakal
खरंच, निसर्गाने प्रत्येक सजीवाला त्याच्या जगण्यासाठी आवश्यक अशी अद्भुत रचना आणि गुणधर्म दिले आहेत. वटवाघळांची ही सवय त्याचाच एक उत्तम नमुना आहे.
Why Bats Hang Upside Down
esakal
Crow Lifespan
esakal