छाती, पाठ आणि खांद्यावर पिंपल्सची समस्या? मग 'हे' उपाय नक्की करा!

Aarti Badade

छाती, पाठ आणि खांद्यावरील मुरुमांची समस्या?

घाम, तेल आणि धूळ यामुळे मुरुमं जास्त प्रमाणात होतात. ही समस्या आत्मविश्वासावरही परिणाम करू शकते.

acne care tips | Sakal

व्यायामानंतर आंघोळ करा

घामामुळे छिद्रात बॅक्टेरिया अडकतात. कसरतीनंतर किंवा उन्हात गेल्यानंतर आंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ राहते.

acne care tips | Sakal

आठवड्यातून २-३ वेळा एक्सफोलिएशन करा

सॅलिसिलिक अॅसिड असलेले स्क्रब वापरल्याने मृत पेशी आणि तेल दूर होतात, आणि त्वचेचे छिद्र स्वच्छ राहतात.

acne care tips | Sakal

घट्ट कपड्यांना 'ना' म्हणा!

टाईट कपडे घाम अडवतात. सुती, सैलसर कपड्यांचा वापर करा जे त्वचेला मोकळेपणाने श्वास घेऊ देतात.

acne care tips | Sakal

बेडशीट आणि उशांचे कव्हर वेळेवर धुवा

बेडशीटमध्ये साचलेले तेल, मृत त्वचा आणि बॅक्टेरिया मुरुमांना कारणीभूत ठरतात. दर आठवड्याला धुणे गरजेचे.

acne care tips | Sakal

ऑईल-फ्री लोशन वापरा

तेलकट मॉइश्चरायझर छिद्र बंद करू शकतात. ऑईल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक प्रॉडक्ट्स वापरणे फायदेशीर ठरते.

acne care tips | Sakal

मुरुम

मुरुमे दाबल्याने जळजळ, डाग आणि संसर्ग वाढू शकतो. मुरुमे नैसर्गिकरित्या बरे होऊ द्या.

acne care tips | Sakal

त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या

जर समस्या गंभीर असेल, तर त्वचाविशेषज्ञांचा सल्ला घ्या. योग्य औषधोपचार आणि उपचार आवश्यक असतात.

acne care tips | Sakal

वजन कमी करायचंय? हे 5 आयुर्वेदिक उपाय ठरतील रामबाण!

Ayurvedic weight loss tips | Sakal
येथे क्लिक करा