Aarti Badade
त्रिफळा पावडर (आवळा, हरड, बेहडा) चयापचय सुधारते आणि पचनक्रिया सशक्त करते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.
कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध मिसळून सकाळी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि चरबी कमी होते.
कॅलरी जास्त न वाढवता मध शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवतो. तो नैसर्गिक गोडवा देणारा आणि चरबी न वाढवणारा आहे.
दररोज सूर्यनमस्कार, कपालभाती यांसारखे योगासने केल्याने फॅट बर्न होतो आणि तणाव दूर राहतो.
आले, दालचिनी आणि बडीशेप यांचा हर्बल चहा पचन सुधारतो आणि चयापचय वेगाने कार्य करू लागतो. वजन कमी होण्यास मदत होते.
अनरोस्टेड कॉफी बीन्समधील क्लोरोजेनिक अॅसिड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो.
हे सर्व उपाय नैसर्गिक असून कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. नियमितता आणि संयम पाळल्यास वजन कायम कमी ठेवता येते.