Yashwant Kshirsagar
आज-काल धावपळीच्या जीवनात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे.
अशा वेळी हृदययाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
पण जाणतेअजाणतेपणे लोकांना रोजच्या जीवनात काही सवयी लागतात ज्या हृदयासाठी घातक असतात.
जर या सवयींना वेळीच आवर घातला नाही तर हृदयविकार होऊ शकतो.
चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी नुकसानकारक आहेत.
प्रमाणापेक्षा जास्त तणाव हा मानसिक आरोग्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगला नसतो.
मीठ प्रमाणापेक्षा जास्त खाणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसते.
जास्त वेळ बसून राहण्यामुळे देखील हृदयाचे आरोग्य बिघडते.
पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा हृदयावर परिणाम होतो, त्यामुळे 7 ते 8 चांगली झोप घेणे आवश्यक आहे.
धुम्रपान आणि जास्त दारु प्यायलाने देखील हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
व्यायाम नियमित न केल्यास देखील रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो, यामुळे हृदयविकार देखील वाढतो.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.