Yashwant Kshirsagar
सध्या आरोग्यदायी पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल आहे. शेवग्याचे आयुर्वेदात खूप महत्व आहे, याच्या सेवनाने अनेक आजारांपासून दिलासा मिळतो.
शेवग्यात अनेक पोषक घटक असतात त्यामुळे याला सुपरफूड देखील म्हटले जाते.
शेवग्यामुळे शरीरातली डायबेटीजची लक्षण कमी होतात. याच्या सेवनाने हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.
शेवगा एनर्जी बुस्टसाठी एक चांगला स्त्रोत आहे यात लोह आणि व्हिटॅमिन ए घटक असतात, हे सर्व घटक एनर्जी लेव्हल संतुलित ठेवण्यात मदत करतात.
शेवगा किंवा शेवगा पावडर योग्य प्रमाणात खाल्ली नाही तर पोट खराब, गॅस, आणि छातीत जळजळ इत्यादी समस्या होऊ शकतात.
गर्भवती महिलांनी शेवग्याचे सेवन करु नये यामुळे मिसकरेजचा धोका वाढू शकतो
स्ननपान करणाऱ्या महिलांनी शेवगा खाऊ नये, कारण यातील काही घटक बाळासाठी योग्य नसतात
रक्त पातळ होणाऱ्या गोळ्या जे लोक खातात त्यांनी नियमित शेवगा खाऊ नये.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड रोगांवर उपचार करण्यासाठी औषधे घेणाऱ्या लोकांसाठी देखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
शेवग्याचे सेवन तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावे त्यानंतरच त्याचा आहारात वापर करावा.