Saisimran Ghashi
तोंडात अन्नाचे कण अडकणे किंवा दात खराब होणे यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
अशात एका झाडाच्या पानांचे सेवन केल्याने ही दुर्गंधी कायमची दूर होईल.
आंब्याच्या झाडाची 4-5 पाने घ्या. ती मिठाच्या पाण्यात धुवून घ्या.
धुतलेली पाने वाळवून घ्या आणि शीरा काढून त्याचे छोटे तुकडे करा.
एका भांड्यात पाणी घ्या त्यात आंब्याची पाने 2 लवंगा कुटून टाका आणि हे पाणी उकळून घ्या.
नंतर हे पाणी गाळून ग्लासमध्ये घ्या. त्यात काळे मीठ किंवा सैंधव मीठ टाका. साधे मीठ वापरू नका.
हे मिश्रम सकाळी रिकाम्यापोटी गुळण्या करा. याने तुम्हाला लवकर फरक जाणवेल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.