Aarti Badade
काजू कतली तर आपण नेहमीच खातो, पण या वेळी काहीतरी खास ट्राय करा! बदाम, साखर आणि केवडा वॉटर वापरून बनवा मऊ आणि चविष्ट 'बदाम कतली'.
Badam Katli Recipe
Sakal
या रेसिपीसाठी १ कप बदाम, १ कप साखर, १/२ कप पाणी, २ चमचे तूप, वेलची पावडर, केवडा वॉटर आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप लागतील.
Badam Katli Recipe
Sakal
बदाम २ तास गरम पाण्यात भिजवून त्याची सालं काढून घ्या. त्यानंतर फॅनखाली सुकवून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या.
Badam Katli Recipe
Sakal
कढईत साखर आणि पाणी एकत्र करून साखर विरघळवून घ्या. त्यात वेलची पावडर, केवडा वॉटर आणि तूप घालून एकतारी पाक तयार करा.
Badam Katli Recipe
Sakal
पाकात बदाम पावडर घालून सतत हलवत राहा. गुठळ्या होऊ देऊ नका. जेव्हा मिश्रण कढईच्या कडा सोडून तूप सोडू लागेल, तेव्हा ते तयार झाले असे समजावे.
Badam Katli Recipe
Sakal
मिश्रण बटर पेपरवर काढून पसरवून घ्या. वरून पिस्त्याचे काप लावा. आता एका लहान डबीच्या टोपणच्या साहाय्याने 'चंद्रकोर' आकारात कतली कापून घ्या.
Badam Katli Recipe
Sakal
तयार आहे तुमची सुंदर आणि चविष्ट बदाम कतली! पाहुण्यांना देण्यासाठी किंवा सणासुदीला घरी बनवण्यासाठी हा एक उत्तम आणि सोपा पदार्थ आहे.
Badam Katli Recipe
Sakal
Rabdi Jalebi Recipe
Sakal