मुघलांना हुसकावून लावणारी गोंडवानाची राणी कोण होती?

सकाळ डिजिटल टीम

दुर्गाष्टमीला जन्म

उत्तर प्रदेशातील चंदेली राजघराण्यात जन्मलेल्या राणी दुर्गावतींचा जन्म दुर्गाष्टमीच्या शुभ दिवशी झाला होता, त्यामुळे त्यांचे नाव दुर्गावती ठेवले गेले.

Brave Gondwana Queen

|

sakal

गोंडवानाचे राजे दलपत शाह

दलपत शहा यांच्या शौर्याविषयी ऐकून राणीने त्यांना एक गुप्त पत्र लिहून मला तुमची जोडीदार होण्याची इच्छा आहे, असं म्हटलं होतं. या पत्रानंतर दलपत शाहा यांनी राणी दुर्गावतीशी त्यांच्या कुलदेवी मंदिरात लग्न केले.

Brave Gondwana Queen

|

sakal 

१६ वर्षे सांभाळले राज्य

१५४२ मध्ये विवाह झाला आणि १५५० मध्ये पतीच्या निधनानंतर राणीने १६ वर्षे अतिशय यशस्वीपणे राज्य केले.

Brave Gondwana Queen

|

sakal

घोडेस्वारी, तीरंदाजी अन् शिकार

राणी दुर्गावती उत्तम घोडेस्वारी, तीरंदाजी आणि तलवारबाजीत पटाईत होत्या; तसेच त्या एक प्रसिद्ध आणि कुशल शिकारी म्हणूनही ओळखल्या जात असत.

Brave Gondwana Queen

|

sakal

मुघल सैन्याशी युद्ध

मुघल बादशहा अकबरच्या सैन्यासोबत झालेल्या पहिल्याच युद्धात राणीने आपल्या पराक्रमाने मुघल सैन्याला माघार घ्यायला लावून हुसकावून लावले होते.

Brave Gondwana Queen

|

sakal

"गुलामगिरीपेक्षा सन्मानाने मरणे केव्हाही चांगले!"

मुघल सैन्याचे सामर्थ्य पाहून मंत्र्यांनी भीती व्यक्त केली तेव्हा राणीने सांगितले की, शरणागती पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने लढून मरणे कधीही श्रेष्ठ आहे.

Brave Gondwana Queen

|

sakal

रणांगणात संपवला जीवनप्रवास

२४ जून १५६४ रोजी शेवटच्या युद्धात शत्रू आपल्याला पकडणार हे लक्षात आल्यावर, राणीने स्वतःच्या हाताने कट्यारीने स्वत:वर वार करत बलिदान दिले.

Brave Gondwana Queen

|

sakal

'बलिदान दिवस'

देशासाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःचा जीव देणाऱ्या राणी दुर्गावती यांच्या स्मृतीखातर दरवर्षी २४ जून ला त्यांचा बलिदान दिवस पाळला जातो.

Brave Gondwana Queen

|

sakal 

जबलपूर विद्यापीठ

राणीच्या या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी १९८३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने जबलपूर विद्यापीठाचे नाव 'राणी दुर्गावती विश्वविद्यालय' असे ठेवले.

Brave Gondwana Queen

|

sakal 

औरंगजेबाच्या 'या' राणीसाठी १६६० मध्ये ताजमहालासारखाच महाल कोणी बांधला होता?

Taj Mahal of the Deccan

|

sakal

आणखी वाचा