भारतातील सर्वात गरीब राजा कोण होता? मुघलांची पार इज्जतच घालवली

संतोष कानडे

बाहदूरशाह जफर

भारतातला सर्वात गरीब राजा म्हणून बाहदूरशाह जफर याचा उल्लेख केला जातो.

मुघल साम्राज्य

तो मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता आणि 1837 ते 1857 या काळात त्याच्या हातात नाममात्र सत्ता होती.

ब्रिटिश

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी बाहदूरशाह जफरला अटक करून दिल्लीतून हद्दपार केले.

खटला

त्याच्यावर खटला चालवून त्याला रंगून (आताचा म्यानमार) येथे निर्वासित म्हणून पाठवण्यात आले.

जीवन

एकेकाळी ज्याच्या नावाने नाणी चलनात होती, त्याच्या शेवटच्या काळात अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगावे लागले.

सत्ता सैन्य

त्याच्याकडे सत्ता, सैन्य किंवा संपत्ती काहीच उरले नव्हते; हा सम्राट ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होता.

दयनीय स्थिती

निर्वासित अवस्थेत जफरला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आणि कुटुंबीयांचीही दयनीय स्थिती झाली.

कबर

1862 साली रंगून येथे त्याचे निधन झाले आणि त्यांची कबरही बराच काळ दुर्लक्षित राहिली.

मुघल परंपरा

वैभवशाली मुघल परंपरेचा शेवट अत्यंत गरिबी व असहाय अवस्थेत झाल्याने त्याला भारतातील सर्वात गरीब राजा म्हटले जाते.

हाताचे फोटो काढा, एआय सांगेल तुमचं भविष्य

<strong>येथे क्लिक करा</strong>