संतोष कानडे
एका मराठी महाराणीनं अनेक वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला अर्थव्यवस्था कशी चालायची? याचा आदर्श घालून दिला होता
त्या होत्या ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाई शिंदे. त्या मूळच्या कागलच्या घाटगे घराण्यातल्या होत्या
बायजाबाई या उज्जैनमधल्या नाथजी किशन दास आणि नाथजी भगवान दास या दोन बँकिंग फर्मच्या प्रमुख होत्या
बनारस येथे देखील त्यांनी आपली बँक सुरु केली होती. बायजाबाई यांच्याकडून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कर्ज घेतलं होतं
त्यांना दिलेल्या ८० लाखाच्या कर्जाचा वापर करून बायजाबाई यांनी ब्रिटिश रिजेंटला आपल्या मुठीत ठेवले होते
बायजाबाईंच्या राज्यकौशल्याचे वर्णन ब्रिटिश गॅझेटमध्ये देखील केलेले आहे
याशिवाय बायजाबाईनी आपली स्वतंत्र चलनव्यवस्था राबवली होती
त्यांनी युद्धांमध्ये झालेले ग्वाल्हेरचे नुकसान त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये भरून काढले होते
हा मिळालेला पैसा जनतेच्या सोयीसुविधांसाठी खर्च केला
१८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले असले तरीही राणीसाहेबांचा दबदबा सर्वत्र पसरला होता
दि. २७ जून इ.स. १८६३ रोजी या महान राज्यकर्त्या बायजाबाई इहलोक सोडून गेल्या