संतोष कानडे
मुस्लिम लोक भारतात पहिल्यांदा आले ते ६२०–६२२ च्या सुमारास. अरबस्थानातून थेट केरळात दाखल झाले.
केरळातल्या मलबार किनाऱ्यावर म्हणजे त्रिशूर जिल्ह्यातल्या कोडुंगल्लूर परिसरात त्यांचं ठाणं होतं.
मुस्लिमांचं भारतात येण्याचं कारण सुगंधी मसाले, मोती, खजूर, अरबी घोडे आणून विकायचे
आणि मिरी, वेलदोडे, दालचिनी, मौल्यवान रत्नं इकडून तिकडे न्यायचे. व्यापार हे प्रमुख कारण होतं.
६१० मध्ये इस्लामची स्थापना झाल्यानंतर अवघ्या १९ वर्षात भारतातली पहिली मशीद उभी राहिली, साल होतं ६२९.
ही मशीद बांधण्याचे आदेश एका हिंदू राजाने दिले होते. त्या राजाचं नाव चेरामन पेरुमल.
मलिक बिन दीनार या व्यापाऱ्यानं ही मशीद बांधली आणि मशिदीला नाव दिलं चेरामन जुमा मशीद.
मशिदीची वास्तू पाहिली तर हिंदू मंदिराचीही झलक आहे, केरळच्या संस्कृतीचाही अंश आहे.
विशेष म्हणजे आजही या मशिदीत स्थानिक हिंदू लोक दीप लावायला जातात.
इस्लाम भारतात आला तो व्यापाराच्या मार्गाने. मात्र त्यानंतर मोहम्मद बिन कासिम सिंध प्रांतात आला आणि हिंसेला सुरुवात झाली.