Monika Shinde
बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या निष्ठेचा सण. आपल्या बैलाला प्रेमाने सजवा आणि त्याच्या मेहनतीसाठी कृतज्ञता व्यक्त करा या खास दिवशी.
बैलाच्या गळ्यात फुलांचा हार, पायात घुंगरं आणि डोक्यावर रंगीत फेटा बांधा. पारंपरिक पोशाखाने बैल उठून दिसतो.
शिंगांना हळदी-कुंकवाचे आकर्षक रंग लावा. शरीरावर नैसर्गिक रंगांनी हलकी सजावट करा. रासायनिक रंग टाळा.
गुलाब, झेंडू, शेवंती यांसारख्या फुलांनी गळा, शिंगं, पाठीवर तोरण बांधा. फुलांची सजावट सौंदर्य आणि शुभता दोन्ही वाढवते.
बैलाच्या गळ्यात आणि पायात घुंगरं बांधल्यास चालताना मधुर आवाज होतो. यामुळे वातावरणात उत्सवाची रंगत वाढते.
बैल सजवल्यानंतर पारंपरिक पार्श्वभूमीत फोटो काढा. रांगोळी, मातीचा वाडा, रंगीत ध्वज यांचा वापर करा.
सजावटीची कोणतीही वस्तू बैलाला त्रासदायक ठरू नये. नैसर्गिक साहित्यच वापरा आणि बैलाच्या आरामाची काळजी घ्या.