Monika Shinde
भारतामध्ये असे काही गावे आहेत जिथे लोक अजूनही विश्वास ठेवतात की भगवान शिव रात्रभर त्यांच्या गावांमधून चालत जातात.
ही श्रद्धा केवळ पुराणकथा नसून, अनेक ठिकाणी लोकं त्याप्रमाणे आपले जीवनही जगतात. काहीजण संध्याकाळी शांतता पाळतात, काही घराबाहेर दिवे लावतात, तर काही जण रोज रात्री त्यांच्या नावाने नैवेद्य ठेवतात.
हिमालयात वसलेले हे गाव. लोक म्हणतात की संध्याकाळनंतर जंगलातून घंटा वाजण्याचा आवाज येतो. कोणत्याही पूजा न करता बेलपानांचा सुगंध येतो. गावकरी मानतात की ही शिवाची उपस्थिती असते.
वाराणसीजवळ हे गाव आहे. लोक मानतात की शिव कधीच काशी सोडत नाहीत. रात्री ते साधूच्या रूपात फिरतात. लोक त्यांना दूध, फुले अशा स्वरूपात नैवेद्य ठेवतात.
केदारताल हे पवित्र सरोवर आहे. आजूबाजूच्या गावात लोक सांगतात की रात्री डमरूचा आवाज ऐकू येतो. ते मानतात की शिव ध्यान करत तिथे बसतात.
गंगा नदीजवळचं हे गाव. लोक म्हणतात की शिव अजूनही गंगेच्या दिशेने चालत जातात. शिवरात्री ते जागून शिवाची वाट पाहतात.
सागरी किनाऱ्यावरील हे गाव महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहासाठी प्रसिद्ध आहे. पण इथले लोक म्हणतात की रात्री एक साधू समुद्रकिनारी चालताना दिसतो आणि अचानक गायब होतो.
अमरनाथ गुहेजवळील गावांमध्ये लोक अजूनही रात्री मंत्रोच्चार ऐकतात. लोकांना वाटतं की शिव अजूनही तिथे पार्वतीला ज्ञान सांगत असतो.
चिदंबरमच्या नटराज मंदिराजवळील गावांमध्ये लोक सांगतात की रात्री पायघड्यांचा आवाज येतो, जणू नटराज अजूनही आपलं नृत्य सादर करत आहे.