जगातील पहिली CNG बाईक भारतात लॉन्च, किंमत अन् फिचर जाणून घ्या...

Sandip Kapde

या मोटरसायकलची किंमत 95,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही मोटरसायकल पेट्रोलवर चालण्यासोबतच CNGवर देखील चालू शकते, ज्यामुळे ती पर्यावरणास अनुकूल आणि इंधन बचत करणारी ठरते.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

बजाज ऑटोने आज अधिकृतपणे जगातील पहिली CNG बाइक बजाज फ्रीडम विक्रीसाठी लाँच केली आहे. एकदा टाकी फूल केली तर ही बाईक 330km पर्यंत जाते.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

बजाज फ्रीडम 125 ही पेट्रोल आणि CNG वर चालणारी दुचाकी आहे. या मोटरसायकलमध्ये दोन इंधन टाक्या आहेत - एक पेट्रोल टाकी आणि दुसरी CNG टाकी.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

या मोटरसायकलमुळे ग्राहकांना दोन्ही इंधन प्रकारांचा वापर करून इंधन बचत आणि पर्यावरणास अनुकूलता मिळवता येईल.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

CNG च्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होते आणि पर्यावरणात कमी प्रदूषण होते.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

बजाज ऑटोच्या मते, फ्रीडम 125 मध्ये CNG चा वापर केल्यामुळे इंधन खर्चात 60% पर्यंत बचत होऊ शकते. तसेच, CNG वापरामुळे वाहनाचे प्रदूषण देखील कमी होते.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

बजाज फ्रीडम 125 ही आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

या मोटरसायकलमध्ये डिजिटल मीटर, एलईडी हेडलाइट, आणि आरामदायी आसन यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे. तसेच, या मोटरसायकलची निर्मिती ग्राहकांच्या गरजांना ध्यानात घेऊन करण्यात आली आहे.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

बजाज फ्रीडम 125 च्या लॉन्चमुळे अन्य मोटरसायकल कंपन्यांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. CNG मोटरसायकलच्या आगमनाने बाजारात नवीन स्पर्धा निर्माण होईल. बजाज ऑटोचे हे नवीन तंत्रज्ञान इतर कंपन्यांसाठी आदर्श ठरू शकते.

bajaj freedom 125 cng bike launch | esakal

Radhika Merchant: अंबानींची धाकटी सून आहे कोट्यांवधींची मालकीण

Radhika Merchant Net Worth
येथे क्लिक करा...