Bajaj Pune Grand Tour 2026 मध्ये भाव खाऊन राहणारी इंदू कोण?

Anushka Tapshalkar

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

सध्या पुण्यात सुरू असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूरने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. या भव्य सायकल स्पर्धेत तब्बल ३५ देशांतील १७४ सायकलिस्ट्स सहभागी झाले आहेत.

Bajaj Pune Grand Tour 2026

|

sakal

लक्षवेधी मॅस्कॉट

या टूरदरम्यान सादर करण्यात आलेल्या रंगीत मॅस्कॉटने उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरवले. मॅस्कॉटसोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Mascot

|

sakal

स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप

ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण करणारा अनुभव ठरली. खेळ, आनंद आणि उत्साह यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

महाराष्ट्राचा अभिमान जागतिक मंचावर

या निमित्ताने महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी असलेला शेकरू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

शेकरूची ओळख

सह्याद्रीच्या घनदाट जंगलात, विशेषतः भीमाशंकर परिसरात मुक्तपणे वावरणारा शेकरू वेग, चपळता, धाडस आणि समतोल यांचे प्रतीक मानला जातो.

Indian Giant Squirrel 

|

sakal

सायकलिस्ट्सच्या गुणांचे प्रतिबिंब

डोंगर उतार, वळणदार रस्ते आणि महामार्गांवर सायकल चालवणाऱ्या खेळाडूंमध्ये असलेली ताकद, सहनशक्ती आणि संतुलन या सगळ्या गुणांचे दर्शन या मॅस्कॉटमधून घडते.

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

लोकल ते ग्लोबल प्रवास

निसर्गाच्या सान्निध्यात उड्या मारणारा, वेगाने धावणारा आणि प्रत्येक पेडलसोबत ऊर्जा पसरवणारा हा मॅस्कॉट स्थानिक ओळखीपासून जागतिक व्यासपीठापर्यंतचा प्रवास अधोरेखित करतो.

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

खेळ आणि निसर्गाचे नाते

ऊर्जेने भरलेला, चपळ हालचाली करणारा हा मॅस्कॉट खेळ आणि निसर्ग यांच्यातील घट्ट नाते प्रभावीपणे अधोरेखित करतो.

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

‘इंदू’ नावामागचा अर्थ

या मॅस्कॉटला ‘इंदू’ हे नाव इंद्रायणी नदीवरून देण्यात आले आहे. जशी इंद्रायणी नदी माणूस, निसर्ग आणि श्रद्धेला जोडते, तसाच संदेश खेळ, पर्यावरण आणि समाज यांच्यातील नाते दृढ करण्याचा ‘इंदू’ देतो.

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

सशक्त प्रतीक

पुणे ग्रँड टूरचा अधिकृत मॅस्कॉट ‘इंदू’ चपळता, समतोल आणि सहनशक्तीचा उत्सव साजरा करणारे एक सशक्त व प्रेरणादायी प्रतीक ठरत आहे

All about Bajaj Pune Grand Tour Mascot Indu

|

sakal

जगातील सर्वात आनंदी प्राणी कोणता?

World's Happiest Animal | sakal
आणखी वाचा