Anushka Tapshalkar
ऑस्ट्रेलियाच्या एका लहान बेटावर राहणारा, नेहमी हसणारा एक छोटा प्राणी!
त्याचं हसू इतकं मनमोहक आहे की तो सोशल मीडियावर स्टार बनला आहे.
हा आनंदी प्राणी प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील पर्थ जवळील रॉटनेस्ट बेटावर सापडतो.
हा प्राणी कांगारू आणि वॉलेबी कुटुंबातील असून त्याचे गोलसर गाल, चमकदार डोळे आणि गोंडस चेहरा त्याला विशेष बनवतो आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.
रात्री जागून पाने, फांद्या खाणारा हा प्राणी शाकाहारी आहे.
दुर्दैवाने, हा प्राणी आता धोक्यात असलेल्या प्रजातींमध्ये गणला जातो. त्यामुळे यांना 'वल्नरेबल' मानले गेले आहे.
या प्राण्याचे संवर्धन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने त्याला संरक्षित प्राण्यांमध्ये समाविष्ट केले आहे.
या हसऱ्या आणि गोंडस प्राण्याचे नाव "क्वॉक" आहे! आणि म्हणूनच हा जगातील सर्वात आनंदी प्राणी म्हणून ओळखला जातो.