Shubham Banubakode
बाजीराव पेशवे अल्पवयीन असतानाच मराठा साम्राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली. त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसाची कहाणी आजही प्रेरणादायी आहे.
१७२० मध्ये बाजीराव पेशवे झाले. श्रीपतराव पंतप्रतिनिधींसारख्या सरदारांना ही निवड न पचल्याने दरबारात मतभेद सुरू झाले.
बाजीराव यांचे धोरण चढाईचे होते, तर पंतप्रतिनिधी संयम आणि वाट पाहण्याच्या भूमिकेत होते. हेच विचारभेद पुढे टोकाला गेले.
मुबारीझखानने मराठ्यांशी झालेल्या तहाच्या अटी मान्य न करण्याची घोषणा केली. ही बातमी ऐकून बाजीराव संतापले आणि चढाईचा निर्धार केला.
बाजीरावांना मोगल सत्तेतील फूट, गोंधळ आणि लष्करी कमकुवतपणा ठाऊक होता. त्यांनी हीच वेळ योग्य मानली.
पंतप्रतिनिधींचे म्हणणे होते की आधी राज्य सुस्थिर करा, नंतर युद्ध करा. पण बाजीराव युद्धाला योग्य वेळ मानत होते.
शाहू महाराजांनी पत्र पाठवून बाजीरावांना साताऱ्याला बोलावले. दरबारात उघड चर्चा झाली. बाजीरावांनी आपल्या योजना स्पष्ट केल्या.
"निजामाशी युद्ध करून उत्तर भारतातील धनधान्याने राज्य समृद्ध करणार," असा ठाम विश्वास बाजीरावांनी व्यक्त केला.
"शिवाजी महाराजांनी भगवा हिमालयात फडकवायची इच्छा केली होती, ती मी पूर्ण करीन," असे बाजीरावांनी ठणकावले.
बाजीरावांची दूरदृष्टी, आत्मविश्वास आणि देशभक्ती पाहून शाहू महाराज प्रसन्न झाले आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला.