...आणि शिवरायांचे स्वप्न बाजीरावाने पूर्ण केलं

सकाळ वृत्तसेवा

पराक्रमाचा अजरामर योद्धा – बाजीराव पेशवे

छत्रपतींनंतर हिंदुस्थानात ज्या सेनापतीने इतिहास घडवला, तो म्हणजे बाजीराव पेशवे.

Peshwa Bajirao | Sakal

शिवरायांच्या स्वप्नांची पूर्ती करणारे बाजीराव

शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, तर बाजीरावांनी त्या स्वराज्याला हिमालयाच्या दिशेने नेलं.

bajirao | esakal

राजकारणात तरबेज

बाजीराव हे केवळ शूर सेनापती नव्हते, तर उत्तम मुत्सद्दीही होते. युद्धकौशल्य आणि चाणाक्ष डावपेच ही त्यांची खासियत होती.

Peshwa Bajirao | Sakal

नवे सरदार – नव्या दिशा

शिंदे, होळकर, पवार यांसारखे नवे, धाडसी सरदार त्यांनी घडवले — ज्यांनी मराठ्यांच्या ताकदीला चार चांद लावले.

Peshwa Bajirao | Sakal

विस्तार धोरण आणि व्यक्तिगत त्याग

सरदार गब्बर झाले, परंतु स्वतः बाजीराव सावकारांच्या कर्जात राहिले. वैयक्तिक लाभावर त्यांनी तुळशीपत्र ठेवलं.

Peshwa Bajirao | Sakal

मुघल साम्राज्याला हादरा

गिरीधर बहादर, दया बहादर, महमदखान वंगश यांच्यावर विजय मिळवून मुघल साम्राज्याला कोसळण्यास त्यांनी हातभार लावला.

shivaji maharaj | Sakal

डावपेचातून विजय

खान डौरान व जयसिंगसारख्या सरदारांशी मैत्री करून त्यांनी त्यांना आपल्या राजकारणात गुंतवून ठेवले.

Chhatrapati Shivaji Maharaj Battles | ESakal

दिल्लीचा तख्त मराठ्यांच्या हाती येण्याची शक्यता

नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात येऊ शकली असती. पण शाहू महाराजांच्या धोरणाचा मान राखून बाजीरावांनी संयम ठेवला.

Shrimant Thorle Bajirao Peshve | Sakal

प्रेमवीर बाजीराव – लोकनायक

इतिहासकार किंकेड म्हणतो: “शूरातला शूर आणि सुंदरातला सुंदर, बाजीराव सर्वांची मनं जिंकतो.”

Bajirao Peshwa | esakal

पनीर प्रेमींसाठी खास! 8 चविष्ट पदार्थांच्या रेसिपी, एकदा ट्राय कराच!

Paneer Recipe | Sakal
येथे क्लिक करा