Saisimran Ghashi
सातारा शहरातील ऐतिहासिक वारसा असलेली ही बारव आजही भूतकाळाच्या खुणा जपून आहे.
ही सुंदर बारव साताऱ्यात "बाजीरावाची विहीर" म्हणून ओळखली जाते.
श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या स्मरणार्थ छत्रपती शाहू महाराजांनी ती बांधली होती.
असं मानलं जातं की या परिसरात थोरले बाजीराव पेशव्यांचा वाडा होता. त्यांच्या निधनानंतर ही बारव बांधण्यात आली.
ही बारव दोन मजली आहे. तिच्या कमानींवर शरभशिल्पं आणि इतर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.
दगडामध्ये कोरलेली ही शिल्पं पेशवाई काळातील कलासंस्कृती दर्शवतात.
कमानी पार केल्यानंतर पुढे विहीर दिसते. या विहिरीवर मोट बसवण्याची व्यवस्था पूर्वीपासून आहे.
मुख्य रस्त्यालगत असल्याने ही बारव सहजपणे पाहता येते.
इतका इतिहास असलेली बारव आज दुर्लक्षित आहे. संवर्धन आणि प्रसिद्धीची गरज आहे.