विदर्भात औरंगजेबाच्या मुलाने बांधला होता ऐतिहासिक किल्ला; काय आहे याचा इतिहास?

Shubham Banubakode

दोन नद्यांच्या संगम

बाळापूर शहरातील मान आणि मैस या दोन नद्यांच्या संगमावर दगड आणि विटांचा वापर करून हा ऐतिहासिक किल्ला बांधण्यात आला.

Balapur Fort

|

esakal

दुहेरी तटबंदी

किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून, जागोजागी मोठे बुरूज बांधले आहेत. त्यामुळे शत्रूवर लक्ष ठेवणं आणि संरक्षण करणं सोपं व्हायचं.

Balapur Fort

|

esakal

बांधकामाला सुरुवात

उपलब्ध माहितीनुसार, औरंगजेबाचा मुलगा मिर्झा आझम शाह याने १७१७ मध्ये किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे इस्माईल खानने ते पूर्ण केल्याचं सांगितलं जातं.

Balapur Fort

|

esakal

जुने दरवाजे

किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर अनेक दरवाजे आहेत. लाकडी दरवाजा, त्यावरील लोखंडी खिळे आणि दिंडी दरवाजा आजही पाहायला मिळतो.

Balapur Fort

|

esakal

फारसी शिलालेख

किल्ल्याच्या भव्य दरवाजाच्या कमानीवर दोन ओळींचा फारसी शिलालेख आहे. दरवाजांवरील मुघल शैलीतील नक्षीकामही लक्ष वेधून घेतं.

Balapur Fort

|

esakal

खोल विहीर

किल्ल्याच्या आत एक मोठी विहीर आहे. तिच्या भिंतींवर वेगवेगळ्या कोनांत विटा लावून कलात्मक बांधकाम केल्याचं दिसतं.

Balapur Fort

|

esakal

जुन्या वाड्याचे अवशेष

विहिरीजवळील चढ चढून गेल्यावर जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. तिथे दोन खोल्या आजही पाहायला मिळतात.

Balapur Fort

|

esakal

पाहण्यासारखी ठिकाणं

शहराच्या दक्षिणेकडे नदीकाठी मिर्झाराजे जयसिंह यांची छत्री आहे. पश्चिमेकडील बारादरी परिसरात प्राचीन शिवमंदिरही पाहायला मिळतं.

Balapur Fort

|

esakal

विदर्भातल्या 'या' गावात होती हिऱ्याची खाण, संरक्षणासाठी बांधला किल्ला, पण...

Vairagad Fort in Gadchiroli

|

esakal

हेही वाचा -