Shubham Banubakode
चंद्रपूरच्या गोंड राजा बल्लाळशहाने पंधराव्या शतकात वैरागड किल्ला उभारला. परिसरातील हिऱ्याच्या खाणींच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
पूर्वी वैरागड परिसर हिऱ्यांच्या खाणींसाठी ओळखला जायचा. या खाणी लुटण्यासाठी मुस्लिम राजांकडून अनेकदा स्वाऱ्या होत असल्याचा उल्लेख आढळतो.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
काळानुसार हिऱ्याच्या खाणी बंद पडल्या. त्यानंतर बल्लाळशहाने आपले सैन्य येथून काढून घेतले आणि किल्ला इतिहासाची आठवण बनून राहिला.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
अंदाजे बाराव्या-तेराव्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांची सत्ता होती. त्यांनी परिसरात अनेक किल्ले उभारल्याचे सांगितले जाते.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
वैरागडमधील भंडारेश्वर मंदिराला अनेक आख्यायिका जोडल्या आहेत. राजा बल्लाळशहाची सून हिराईदेवीने पतीच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
वैरागडचं भंडारेश्वर मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते आणि परिसर भक्तांनी गजबजून जातो.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
वैरागड किल्ल्याची बरीच पडझड झाली असली तरी तटबंदी, प्रवेशद्वार आणि काही बुरूज आजही जुन्या इतिहासाची साक्ष देतात.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
किल्ल्यातून आरमोरी ठाणेगावच्या हेमाडपंती मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याची चर्चा आहे. किल्ल्याच्या देखभालीची कामेही पुरातत्व विभागाकडून सुरू आहेत.
Vairagad Fort in Gadchiroli
esakal
Hiccups Meaning
esakal