Shubham Banubakode
नारायण श्रीपाद राजहंस मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते.
त्यांना बालगंधर्व या नावानेही ओळखं जात होतं.
ज्या काळात महिला रंगभूमीवर अभिनय करत नव्हत्या, त्या काळात बालगंधर्व स्त्री-भूमिका करायचे.
त्यामुळे बालगंधर्व यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. अभिनयासह गायनावरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होतं.
बालगंधर्व यांच्या नावानं आज पुण्यात मोठं नाट्यगृह आहे.
मात्र, बालगंधर्व यांना संगीत आणि अभिनयाचे प्राथमिक धडे कुठे मिळाले? तुम्हाला माहिती का?
बालगंधर्व लहान असतांना एकदा रुसून ते अमरावतीला पळून गेले होते.
अमरावतीत त्यांच्या राहण्याची व्यवस्था दादासाहेब खापर्डे यांनी केली होती.
दादासाहेब खापर्डेंनी प्राख्यात गवई नामदेव बुवाजवळ त्यांच्याकडे त्यांच्या गायन शिक्षणाची व्यवस्था केली.
ही घटना आहे मार्च १९०५ सालची. बालगंधर्व अमरावतीत जवळपास ६ महिने होते.
त्यामुळे बालगंधर्वांना संगीत आणि अभिनयाचे प्राथमिक धडे अमरावतीलाच मिळाले.
२०२० मध्ये प्रकाशित 'इये इंद्रपुरीचिये नगरी' या नववर्ष विशेषांकातील मजकूर