Shubham Banubakode
मुंबई हे भारतातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र आहे.
पण देशातल्या सर्वात मोठ्या चित्रपट निर्मिती केंद्राला कधीकाळी विदर्भातल्या एका शहरातून पैसा पुरवला जायचा.
हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे. विदर्भातील हे शहर म्हणजे अमरावती
५० ते ९० च्या दशकात अमरावतीचा सिनेव्यवसाय अत्यंत जोरात होता.
सिपी अॅन्ड बेरार या झोनमधील बहुतेक वितरक अमरावतीला राहायचे.
त्यामुळे मुंबईच्या चित्रपटसृष्टीला अमरावतीवरुन पैसा पुरविल्या जात असे.
अमरावतीच्या चित्रपट व्यवसायात शंकरलाल राठी यांचे योगदान फार महत्वाचे होतं.
राठी यांनी अनेक थिएटर त्याकाळात भाड्याने चालवण्यास घेतली होती. रायपुरपासून भुसावळपर्यंत बहुतेक थिएटर ते चालवत असत.
त्या काळात अमरावतीला अनेक चित्रपटगृहात चित्रपट १००-१०० दिवस चालायचे.
शहराची लोकसंख्या २ लाख असताना शहरात ११ सिनेमा थिएटर होती.
अमरावतीला जी मोठ-मोठी वितरण मंडळी होती त्यांच्या स्वतःच्या दुरिंग टॉकीज होत्या.
यात्रेमध्ये या दुरिंग टॉकीज चिक्कार धंदा करीत असत, असा हा अमरावतीच्या सिनेमाचा भरभराटीचा काळ होता.
२०२० मध्ये अमरावतीत प्रकाशित 'इये इंद्रपुरीचे नगरी', या नववर्ष विशेषांकतील मजकूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.