सकाळ वृत्तसेवा
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात सध्या असंतोष आणि बंडखोरी सुरू आहे. नुकतंच त्यांनी देश स्वतंत्र झाला आहे असं घोषित केलं आहे.
भारताच्या इतिहासात बलुचिस्तानने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पाहुया 1540 ते 1666 पर्यंतचा प्रवास.
1540 मध्ये बाबरचा मुलगा हुमायून शेरशाह सूरीशी युद्धात हरला. पराभवानंतर तो भारतातून पळून गेला.
हुमायूनने इराणमध्ये आश्रय घेतला. तिथे त्याने आपल्या सैन्याची पुन्हा बांधणी केली.
1545 मध्ये शेरशाह सूरीचा मृत्यू झाला. हीच संधी पाहून हुमायूनने भारतात परतण्याची योजना आखली.
बलुचिस्तानातील कबीलाई सरदारांनी हुमायूनला मदत केली. बलुचांचे सहकार्य मिळाल्यामुळे त्याचे मनोबल वाढले.
1555 मध्ये हुमायूनने दिल्ली पुन्हा जिंकली. तो पुन्हा एकदा भारताचा बादशाह झाला.
1659 मध्ये औरंगजेब दिल्लीचा शासक बनला. त्याची सत्ता ईराणच्या सीमेपर्यंत पसरली होती.
दक्षिण भारतात शिवरायांकडून औरंगजेबला मोठा विरोध होता. मुघलांना मराठ्यांशी अनेक लढाया कराव्या लागल्या.
याचा फायदा घेऊन बलुच सरदारांनी औरंगजेबविरुद्ध बंड पुकारलं. मीर अहमद या बलुच नेत्याने नेतृत्व स्वीकारले.
1666 मध्ये मीर अहमदने कलात आणि क्वेटा हे भाग जिंकले. बलुचांनी औरंगजेबकडून बलुचिस्तानचे भाग स्वतंत्र केले.