सकाळ डिजिटल टीम
पूर्णपणे स्वच्छ आणि पिवळ्याधमक केळींऐवजी ज्यांच्या सालीवर नैसर्गिक काळे किंवा तपकिरी ठिपके आहेत, अशीच केळी प्राधान्याने खरेदी करावीत.
Banana
Esakal
ज्या केळींचे देठ हिरवेगार नसून सालीच्या रंगाशी मिळून जाणारे (पिवळसर किंवा काळे) आहे, तीच केळी नैसर्गिकरीत्या पिकलेली असतात.
Banana
Esakal
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळींना एक विशिष्ट गोड सुगंध येतो. कृत्रिम केळींना असा सुगंध नसतो, उलट कधी-कधी रसायनांचा उग्र वास येऊ शकतो.
Banana
Esakal
असामान्यरीत्या खूप मोठी दिसणारी केळी संशयास्पद असू शकतात; त्याऐवजी मध्यम आकाराची गावरान किंवा स्थानिक केळी अधिक सुरक्षित आणि चविष्ट असतात.
Banana
Esakal
रस्त्यावरील फिरत्या अनोळखी विक्रेत्यांपेक्षा, ज्यांच्याकडे फळे पिकविण्याची सुरक्षित पद्धत आहे, अशा ओळखीच्या आणि विश्वासू फळ विक्रेत्याकडूनच खरेदी करा.
Banana
Esakal
बाजारात मिळणारी बहुतांश केळी अत्यंत वेगाने आणि एकाच वेळी पिवळी झालेली दिसतात. नैसर्गिकरीत्या केळी पिकण्यासाठी ठरावीक वेळ, योग्य वातावरण आणि तापमान लागते.
Banana
Esakal
बाजारात वाढती मागणी आणि वाहतुकीदरम्यान फळे खराब होऊ नये म्हणून काही व्यावसायिक कॅल्शियम कार्बाइड या बंदी घातलेल्या रसायनाचा बेकायदेशीर वापर करत आहेत.
Banana
Esakal
कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांनी पिकवलेली केळी खाल्ल्याने पचनसंस्थेवर थेट विषारी परिणाम होतो. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक धोका आहे.
Banana
Esakal
Why Cats Cry At Night
esakal