Anushka Tapshalkar
केळं नियमित खाण्यानेच नव्हे तर केळ्याचा फेस पॅक लावल्यानेही त्वचेला नैसर्गिक ओलावा, चमक आणि विविध त्वचा समस्यांपासून आराम मिळतो. हा मास्क स्वस्त, सहज उपलब्ध आणि घरच्या घरी तयार करता येणारा असून सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे.
Banana Face Mask
sakal
१/४ पपई, १/४ काकडी आणि १/२ केळं एकत्र वाटून पेस्ट बनवा. चेहरा आणि मानेला लावा, १५ मिनिटं ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. हे तेलकट त्वचेला पोषण आणि हायड्रेशन पुरवते.
Banana Mask for Oily Skin
अर्धे केळं, १ टीस्पून हळद किंवा १ टेबलस्पून नीम पेस्ट एकत्र करून पेस्ट बनवा. चेहरा आणि मानेला लावा, २० मिनिटं ठेवा आणि पाण्याने धुवा. हे मुरुम आणि डागांवर प्रभावी आहे.
Banana Mask for Pimples
sakal
अर्धवट पिकलेले केळे २ टेबलस्पून दह्यात मिसळून चेहरा आणि मानेला लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. हे कोलेजन वाढवून सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
Banana Mask for Skin Aging
sakal
१ केळं, मध आणि कच्चं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहरा आणि मानेला लावा, १५ मिनिटं ठेवा आणि साध्या पाण्याने धुवा. हे त्वचेला उजळपणा आणि ताजेपणा प्रदान करते.
Banana Mask for Natural Glow
sakal
पिकलेलं केळं मॅश करून त्यात मध आणि नारळ तेल घाला. चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटं ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. हे त्वचेला दीर्घकाळ ओलसर ठेवतं.
Banana Mask for Dry Skin
sakal
१ केळं, १/३ कप दही आणि १ टीस्पून हळद एकत्र करून पेस्ट बनवा. चेहरा आणि मानेला लावा, १५ मिनिटं ठेवा आणि साध्या पाण्याने धुवा. हे त्वचेवरील डाग कमी करून त्वचेला स्वच्छ बनवते.
Banana Mask for Pigmentation
sakal
१/२ पिकलेलं केळं, १ टेबलस्पून बेसन आणि १/२ लिंबाचा रस एकत्र करा. चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटं ठेवा आणि पाण्याने धुवा. हे टॅनिंग कमी करून त्वचेला उजळ बनवते.
Banana Mask for Glowing Skin
sakal
Why Talking Whlile Eating is Not Good
sakal