Varsha Balhe
पूजा, सण किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये नैवेद्य दाखवताना अनेक ठिकाणी केळीच्या पानाचा वापर केला जातो. पण यामागे नेमकं कारण काय आहे?
WHY BANANA LEAF IS USED FOR NAIVEDYA AND PUJA
esakal
हिंदू धर्मात केळीचं झाड आणि त्याची पानं पवित्र मानली जातात. त्यामुळे देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी केळीच्या पानाचा वापर करण्याची परंपरा आहे.
WHY BANANA LEAF IS USED FOR NAIVEDYA AND PUJA
esakal
केळीचं पान हे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सत्यनारायण पूजा, सण आणि विविध धार्मिक विधींमध्ये त्यामुळेच त्याचा वापर केला जातो.
WHY BANANA LEAF IS USED FOR NAIVEDYA AND PUJA
esakal
केळीच्या पानावर गरम अन्न वाढल्यावर त्यातील काही नैसर्गिक वनस्पतीजन्य घटक अन्नाच्या संपर्कात येतात. त्यामुळे पानावर जेवण्याची परंपरा केवळ धार्मिक नाही, तर पारंपरिक आरोग्यदृष्टीनेही पाहिली जाते.
WHY BANANA LEAF IS USED FOR NAIVEDYA AND PUJA
esakal
केळीच्या पानामध्ये काही अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने त्याचा वापर अन्न वाढण्यासाठी केला जातो.
WHY BANANA LEAF IS USED FOR NAIVEDYA AND PUJA
esakal
केळीचं पान नैसर्गिक आणि जैवविघटनशील असल्यामुळे पर्यावरणासाठीही चांगला पर्याय आहे. वापरल्यानंतर ते सहजपणे निसर्गात मिसळतं.
Banana Leaf Food
esakal
म्हणूनच नैवेद्यासाठी केळीच्या पानाचा वापर करण्यामागे धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणपूरकता अशी अनेक कारणं आहेत.
Banana Leaf Uses
esakal