गुलकंदचा मोदक कधी खाल्लाय का? जाणून घ्या रेसिपी

Varsha Balhe

गुलकंदचा मोदक

गणेशोत्सव सुरू झाला की बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवायची लगबग सुरू होते. अनेक प्रकारचे मोदक बाप्पासाठी बनवले जातात, परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीचे गुलकंद मोदक पाहणार आहोत.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

उत्तम पर्याय

तळणीचे किंवा उकडीचे मोदक नेहमीच बनवतो. पण यंदा काहीतरी वेगळं आणि झटपट बनवायचं असेल, तर गुलकंद मोदक हा उत्तम पर्याय आहे. हे मोदक चवीला स्वादिष्ट आणि सुगंधी लागतात.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

साहित्य

हे मोदक बनवण्यासाठी सुकं खोबरं, मिल्क पावडर, दूध, पिठीसाखर, तूप, वेलची पूड आणि गुलकंद लागेल. सारणासाठी बारीक चिरलेला काजू-बदाम-पिस्ताही घेऊ शकता.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

तूप

सर्वप्रथम पॅनमध्ये थोडं तूप गरम करून त्यात सुकं खोबरं हलकं परतून घ्या. त्यात दूध आणि मिल्क पावडर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

सिरप

मिश्रणात पिठीसाखर आणि हवे असल्यास गुलाब सिरप घाला. मिश्रण गोळ्यासारखं झालं की गॅस बंद करून ते थोडं थंड होऊ द्या.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

सुकामेवा

आता गुलकंदामध्ये बारीक चिरलेला सुकामेवा आणि वेलची पूड मिसळून लहान गोळे तयार करा. हे गुलकंदाचं सारण मोदकाच्या मधोमध भरण्यासाठी वापरायचं आहे.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

खोबऱ्याचं मिश्रण

मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून त्यात खोबऱ्याचं मिश्रण भरा. मधोमध गुलकंदाचं सारण ठेवून मोदक बंद करा आणि साच्यातून अलगद बाहेर काढा.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

तयार आहे

साच्यातून मोदक बाहेर काढा. तुम्ही हे मोदक उकडून किंवा तळून घेऊ शकता. तयार आहेत तुमचे चविष्ट मोदक.

GULKAND MODAK RECIPE FOR GANESH CHATURTHI

|

esakal

विड्याच्या पानांचा मोदक कधी खाल्लाय का? जाणून घ्या रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Betel Leaf Modak Recipe

|

esakal

येथे क्लिक करा