सकाळ डिजिटल टीम
केवळ भारतीयच नाही तर जगभरातून या शहरामध्ये लोक मोठ्या संख्येने पर्यटनाला जातात
या शहराचं नाव आहे बँकॉक. हे शहर थायलंडची राजधानी आहे. येथे भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो.
विशेष म्हणजे बँकॉक ट्रिप ही बजेट फ्रेंडली असते. विमानाचं तिकीटासह वास्तव्य आणि खाणपाण सगळंकाही स्वस्तात होतं.
नाईट लाईफ हे या शहराचे वगळंच आकर्षण आहे. ही जीवनशैली बघण्यासाठी आणि जगण्यासाठी लोक उत्सुक असतात.
बँकॉकमध्ये Chatuchak Weekend Market, Platinum Fashion Mall जगभरात प्रसिद्ध आहेत.
येथे गिफ्टस् गॅझेट्स, कपडे मिळतात. त्यामुळे खरेदी करण्यासाठीही अनेक भारतीय लोक तिथे जातात.
या शहराची दुसरी बाजू म्हणजे येथे प्राचीन मंदिरे, जुनी संस्कृती बघायला मिळते.
चांगलं अन्न, लोकांचा नम्र स्वभाव, सुरक्षितता यामुळे बँकॉकला लोक गर्दी करतात.