संतोष कानडे
मथेरान हे ठिकाणी आशिया खंडातील एकमेव कार-फ्री हिल स्टेशन आहे. इथे जाण्यासाठी नेरळवरुन टॉय ट्रेन मिळते.
जंगली पर्यटन, दाट धुकं आणि लाल मातीचे रस्ते... हे या भागाचं आकर्षण आहे. टॉय ट्रेन हा प्रवसाचा बेस्ट पर्याय आहे.
चहाचे सुंदर मळे आणि वळणावळणाच्या डोंगररांगा अनुभवायच्या असतील तर दार्जिलिंग हा उत्तम पर्याय आहे.
दार्जिलिंगची हिमालयन रेल्वे ही UNESCO ची जागतिक वारसा रेल्वे आहे. न्यू जलपाईगुडीहून टॉय ट्रेनने प्रवास करता येतो.
तामिळनाडूतलं रामेश्वरम हा एक रेल्वे प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. येथे जाताना दोन्ही बाजूंनी समुद्र अनुभवता येतो.
पंबन समुद्री पुलावरून जाणारी ही रेल्वे अनुभवणं म्हणजे निव्वळ मौज असते. हा प्रवास प्रत्येकाने अनुभवण्यासारखा आहे.
कोकण रेल्वेच मुळात सुखद अनुभव आहे. नद्या, धबधबे आणि हिरवळ अनुभवायची असेल तर वेंगुर्ला-सावंतवाडी प्रवास करावा.
कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला रोड हे ठिकाणं या वेंगुर्ला सावंतवाडी रेल्वेने अनुभवता येतील. या मार्गावर अनेक टुरिस्ट पॉईंट आहेत.
मेट्टुपालयमहून निलगिरी माउंटन रेल्वेने उटीला जाता येतं. ही ट्रेन २०० हून अधिक बोगदे आणि शेकडो पूल ओलांडून पुढे जाते.
हा प्रवासच मुळात पर्यटनाचा वेगळा आनंद देऊन जातो. शिवाय उटीतला टुरिस्ट पॉईंट बघण्यासारखे आहेत.