सकाळ डिजिटल टीम
जगभरात अनेक विचित्र प्रथा परंपरा आहेत. भारताचा शेजारी देश बांगलादेशात बऱ्याच काळापासून सुरू आहे.
बांगलादेशात मंडी नावाची एक आदिवासी जमात आहे. मंडी आदिवासींमध्ये व्यक्ती मुलीसोबतच लग्न करू शकतो.
बापानेच मुलीसोबत लग्न करणं या परंपरेवर विश्वास बसणार नाही पण ही परंपरा अनेक वर्षांपासून तिथे आहे.
एखाद्या पुरुषाने विधवा महिलेशी लग्न केलं तर तो पुरुष महिलेला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीशी विवाह करू शकतो. म्हणजे जी मुलगी त्याला बाबा म्हणत असते तीच त्याची पत्नी बनते.
मंडी आदिवासी यामागे कारण देतात की यामुळे विधवा महिला आणि तिच्या मुली सुरक्षित राहतात. पुरुष कुटुंबाला सांभाळतो, काळजी घेतो असं सांगण्यात येतं.
अल्पवयीन मुलींचे शोषण आणि त्यांचं बालपण चिरडून टाकण्याचाच हा एक प्रकार असल्याचे आरोप होतात. ज्या मुलींना वडिलांचं प्रेम हवं असतं त्यांना त्याच वडिलांसोबत लग्न करावं लागतं.
आंबेडकरांचा मुलगा चक्क रांगेत उभा होता, कसा होता सूर्यपुत्राचा साधेपणा?