संतोष कानडे
प्राचीन काळी बंगाल क्षेत्र हा भाग शाक्त परंपरेचे अनुयायांचा भाग होता. शक्तीची देवी दुर्गेच्या आराधनेचं ते प्राचीन केंद्र होतं.
या केंद्राचा प्रसार ओडिशा, बिहार, आसामपर्यंत होता. आज ज्याला आपण बांगलादेश म्हणतो तो याच परंपरेचा पालक आहे.
भलेही बांगलादेश स्वातंत्र्यानंतर पूर्व पाकिस्तानात गेला असेल किंवा १९७१ मध्ये स्वतंत्र देश बनला असेल. परंतु या देशात देवी भगवतीचे सात शक्तिपीठं आहेत.
बांगलादेश एक मुस्लिम राष्ट्र असला तरी या देशात देवीची सात शक्तिपीठं आहेत.
दुर्गासप्तशतीमध्ये देवीचे १०८ नावं सांगितलेली आहेत. बांगलादेशातली सात शक्तिपीठं याच नावाने आहेत.
बांगलादेशात सुगंधा शक्तिपीठ, जसोरेश्वरी शक्तिपीठ, भवानी शक्तिपीठ, जयंती शक्तिपीठ, महालक्ष्मी शक्तिपीठ, अपर्णा शक्तिपीठ आणि स्त्रावनी शक्तिपीठ आहेत.
या शक्तिपीठांना हिंदू पौराणिक कथांमध्ये विशेष महत्त्व आहे. सर्व शक्तिपीठं देवी सतीच्या शरीराच्या विविध अंगांशी जोडलेली आहेत.
देवी सती भगवान शंकराच्या पत्नी होत्या. बांगलादेशात या शक्तिपीठांचं ठाणं असणं हे शाक्त परंपरेचं प्रमाण आहे.