मृत्यूनंतर खात्यावरचे पैसे कोण काढू शकतो? वारस नोंद नसल्यास काय? बँक लगेच पैसे का देत नाही?

सकाळ डिजिटल टीम

मृत्यूनंतर बँक खात्याचे काय

बँकेच्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पैसे काढण्याचे नियम आहेत. त्यात वारस, नॉमिनी आणि कायदेशीर प्रक्रिया ठरलेली असते.

Bank Account

|

Esakal

वारस नोंद

खात्याला वारस नोंद केले असतील तर मृत व्यक्तीनंतर त्याच्या खात्यावरील पैसे काढणं सोपं जातं.

Bank Account

|

Esakal

कायदेशीर प्रक्रिया

वारसाला पैसे काढता येतात पण ते पैसे कायदेशीर वारसांना वाटप करणं आवश्यक असतं. वारसांमध्ये वाद असतील तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते.

Bank Account

|

Esakal

जॉइंट खाते

एखादे खाते जॉइंट असेल तर त्या खात्याला असलेला दुसरा धारक हा सहज त्या खात्यावरचे पैसे वापरू शकतो.

Bank Account

|

Esakal

Bank Accountवारस नोंद नसल्यास?

बँक खात्याला वारस नोंद नसेल किंवा जॉइंट खात्याचा धारक नसेल तर पैसे काढण्यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

Bank Account

|

Esakal

Bank Accountकागदपत्रे

मृत व्यक्तीच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र,ओळखपत्र, वारसाचे नाते सांगणारा पुरावा, बँकेचा अर्ज लागतो. याशिवाय कधी कधी कोर्टाचा आदेशही आवश्यक असतो.

Bank Account

|

Esakal

बँक लगेच पैसे देत नाही

फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून लगेच पैसे दिले जात नाहीत. नियमानुसार योग्य वारस निश्चित झाल्यानंतर पैसे दिले जातात.

Bank Account

|

Esakal

महत्त्वाची सूचना

बँकेच्या खात्याला वारस नोंद करणं महत्त्वाचं आहे. तसंच तुमच्या खात्याची माहिती कुटुंबियांना असल्यास कायदेशीर अडचणी येत नाहीत.

Bank Account

|

Esakal

कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र नसेल तर मालमत्तेचा वारसा कुणाला किती मिळतो? जाणून घ्या नवा नियम

property division without will

|

ESakal

इथं क्लिक करा