Aarti Badade
"हार्ट लॅम्प" या पुस्तकासाठी बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भस्ती यांना इंटरनॅशनल बुकर प्राईजने सन्मानित करण्यात आले आहे.
७७ वर्षांच्या बानू मुश्ताक या कन्नड भाषेतील पहिल्या लेखिका आहेत ज्यांना हा जागतिक पुरस्कार मिळाला आहे.
हा केवळ कथासंग्रह नाही, तर कर्नाटकातील मुस्लिम महिलांच्या जीवनाचे जिवंत प्रतिबिंब आहे.
धर्म, पितृसत्ता, समाज आणि राजकारणाच्या गुंतागुंतीत अडकलेल्या महिलांचे भावविश्व बानू मुश्ताक यांनी १२ कथांमधून उलगडले आहे.
बानू मुश्ताक यांनी केवळ लेखनात नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही परंपरांना आव्हान दिले आणि स्वतःचा जीवनसाथी निवडला.
२६व्या वर्षी त्यांची पहिली कथा ‘प्रजामाता’ या मासिकात प्रकाशित झाली. त्यांच्या वडिलांनी लेखनात नेहमी साथ दिली.
कर्नाटकातील प्रगतिशील चळवळी, विशेषतः बंदया साहित्य आंदोलन, यांनी त्यांच्या लेखनाला धार दिली.
कर्नाटक साहित्य अकादमी, दाना चिंतामणि अत्तिमाबे पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी बानू मुश्ताक यांचा गौरव झाला आहे.
‘हसीना गट्टू इथारा कथेगलू’ (2013) आणि ‘हदीना स्वयंवर’ (2023) या त्यांच्या चर्चित साहित्यकृती आहेत.