Aarti Badade
सामान्य टपरीवर चहा १० ते २० रुपयांना मिळतो, पण मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये याची किंमत तुमच्या कल्पनेपलीकडची आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अदनान पठाणने ताज हॉटेलमध्ये घेतलेल्या चहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
ताज हॉटेलमध्ये "Bom Hi Tea" नावाचा चहा १८०० रुपयांना मिळतो, हे ऐकून अनेकजण थक्क झाले.
१८०० रुपये चहा आणि ३२४ रुपये GST – एकूण चहाचे बिल झाले थेट २१२४ रुपये.
या महागड्या चहा सोबत कॉम्प्लिमेंटरी बिस्किट्स, मिठाई आणि वडापावही दिला जातो, असं अदनान पठाणने सांगितलं.
अदनानने चहाचे मूळ बिल चाहत्यांसोबत शेअर केल्यावर ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं.
२१०० रुपयांचा चहा अनुभव म्हणून घ्यायचा की फिजूलखर्च मानायचा, हे प्रत्येकाच्या पसंतीवर आहे!