Shubham Banubakode
गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झालं.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशातच त्यांच्या २००९ सालच्या अमेरिका दौऱ्याचीही चर्चा सुरु आहे.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी व्हाईट हॉऊसमध्ये मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं होतं.
यादौऱ्यादरम्यान मनमोहन सिंग यांच्या पत्नीही त्यांच्याबरोबर होत्या.
बराक ओबामा- मिशेल ओबामा यांनी मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांचं उत्साहात स्वागत केलं होतं.
ओबामा राष्ट्रपती झाल्यानंतर व्हाईट हाऊसला भेट देणारे मनमोहन सिंग हे पहिलेच नेते होते.
त्यावेळी मनमोहन सिंग यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष प्रतिभोज आयोजित करण्यात आला होता.
यादौऱ्यादरम्यान दोन्ही देशातील संबंध सुदृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
तसेच आर्थिक, उर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आता बराक ओबामा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा मनमोहन सिंग बोलतात, तेव्हा पूर्ण जग ऐकतं, असं बराक ओबामा म्हणाले.