Shubham Banubakode
आपल्यापैकी अनेकांना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा असेल.
पण दोन्ही देशातील संबंध आणि सुरक्षेच्या कारणांमुळे ते शक्य नाही.
मात्र, असा एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही थेट पाकिस्तानात प्रवेश करू शकता.
विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला व्हिसा घेण्याचीही आवश्यकता नाही.
हा मार्ग म्हणजे करतारपूर कॉरिडॉर
हा कॉरिडॉर भारतातील पंजाबमधील गुरुदासपूरला थेट करतारपूर साहिब गुरुद्वाराशी जोडतो.
करतारपूर साहिब गुरुद्वारा हे धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आहे.
शीख धर्मगुरु गुरुनानक यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १८ वर्ष याच ठिकाणी घालवली होती.
हा कॉरिडॉर १२ नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरु करण्यात आला होता.
गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त हा कॉरिडॉर सुरु करण्यात आला होता.
करतारपूर कॉरिडॉरला भेट देण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
त्यानंतर १५ दिवसांत तुम्हाला मेलवर ईलेट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायजेशन म्हणजे ईटीए प्राप्त होतो.
हा ईटीए, आधार कार्ड आणि पासपोर्ट तुम्हाला प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी बरोबर ठेवणे आवश्यक आहे.
करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देण्यासाठी तुम्हाला अमृतसरवरून डेराबाबा नानक इथे पोहोचावं लागेल.
त्यानंतर २० अमेरिका डॉलरची फी भरल्यानंतर तुम्हाला करतारपूरसाठी प्रवेश दिला जातो.
तिथेतून तुम्हाला करतारपूर गुरुद्वारा जाण्यासाठी बस उपलब्ध असते.
करतारपूर गुरुद्वारा परिसरात तुम्ही पाकिस्तानी वस्तूंची खरेदी करू शकता.
विशेष म्हणजे इथे तुम्ही भारतीय रुपयांमध्येही व्यवहार करू शकता.
१९ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान गुरुद्वाराला भेट देऊ शकता.
संध्याकाळी ६ पूर्वी कोणत्याही परिस्थिती तुम्हाला परत येणे बंधनकारक आहे.