1757 ची एक लढाई... आणि भारताचा इतिहास कायमचा बदलला!

Vinod Dengale

प्लासीची लढाई

1757 मध्ये झालेली ही प्लासीची लढाई भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते. कारण यानंतर भारतात ब्रिटिश सत्तेची खरी सुरुवात झाली.

लढाई कुठे आणि केव्हा झाली?

23 जून 1757 रोजी बंगालमधील प्लासी या गावाजवळ ही लढाई झाली. यात एका बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा नवाब सिराज-उद-दौला होता.

संघर्षाची सुरुवात

कंपनीला बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र ते आपल्या व्यापार विशेषाधिकारांचा गैरवापर करत होते. त्यामुळे नवाब आणि ब्रिटिश यांच्यात तणाव वाढला.

नवाबाची चिंता

या काळात इंग्रजांनी कोलकात्यात नवाबाच्या परवानगीशिवाय किल्लेबंदी सुरू केली होती. तसेच ब्रिटिशांनी नवाबाच्या विरोधकांना संरक्षण दिल्यामुळे सिराज-उद-दौला संतापला.

रॉबर्ट क्लाइव्हची योजना

ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह यांनी नवाबाच्या दरबारातील मीर जाफर, जगत सेठ यांच्याशी नवाबाविरोधात गुप्त करार केला.

विश्वासघातामुळे पराभव

त्यानंतर लढाईदरम्यान नवाबाच्या अनेक सेनापतींनी साथ सोडली. त्यामुळे 50 हजार सैन्य असूनही सिराज-उद-दौलाचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी बंगालमध्ये आपला पाया रोवला.

मीर जाफर बनला नवा नवाब

ब्रिटिशांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले. मात्र प्रत्यक्ष सत्ता हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात जाऊ लागली.

भारतावर काय परिणाम?

प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांना बंगालची प्रचंड संपत्ती मिळाली. यामुळे भारतात त्यांची राजकीय आणि आर्थिक ताकद वाढली.

ब्रिटिश राजवटीची सुरुवात

इतिहासकारांच्या मते, प्लासीची लढाई ही भारतातील ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात मानली जाते. यानंतर इंग्रजांनी भारतात आपला प्रभाव वेगाने वाढवला.

वडिलांच्या आधी आईला मान! नावापुढे मातेचं नाव जोडणारी पहिली व्यक्ती मराठी

Gautamiputra Satakarni History

|

esakal

हेही वाचा