Monika Shinde
रात्री झोपताना उशीखाली तमालपत्र ठेवण्याची प्रथा अनेक संस्कृतींमध्ये आहे. याचा वापर फक्त पाककृतीसाठी नव्हे, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी देखील लोक वापर करतात.
काही लोकांचा विश्वास आहे की यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. यामुळे चांगली झोप आणि सुखद स्वप्ने यासाठी हा छोटासा रात्रीचा विधी उपयुक्त ठरतो.
ग्रीक आणि रोमन संस्कृतीत तमालपत्राला संरक्षण, यश, प्रज्ञा यांचे प्रतीक मानले जात असे. आणि पलंगाजवळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते.
अनेक संस्कृतींमध्ये झोपण्यापूर्वी सुगंधी पानं मन शांत करण्यासाठी वापरली जात. त्यामुळे झोपेवर सकारात्मक परिणाम होतो, असा अनेक लोकांचा विश्वास आहे.
लोकांचे म्हणणे आहे की तमालपत्र इच्छापूर्ती आणि चांगली स्वप्ने आकर्षित करते. हे फक्त प्रतीकात्मक आहे, परंतु मनाला मानसिक शांतता मिळते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, झोप सुधारण्यावर तमालपत्राचा थेट परिणाम सिद्ध नाही. मात्र लहानसा रात्रीचा विधी मन शांत ठेवतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारतो.
हा उपाय सोपा आणि सुरक्षित आहे. फक्त पान कोरडे असावे आणि कापडी पाउचमध्ये ठेवणे उत्तम ठरते.