तब्बल 200 गेट्स, 36 प्लॅटफॉर्म्स आणि 38 लाख प्रवासी; हे स्टेशन आहे तरी कुठे?

Monika Shinde

रेल्वे स्टेशन

जगातील सर्वांत वर्दळीचं रेल्वे स्टेशन कुठे आहे. माहित आहे का? शिंजुकू रेल्वे स्टेशन, टोकियो! येथे दररोज लाखों प्रवासी प्रवास करतात आणि सुविधा पाहून थक्क व्हाल.

प्रवाशांची संख्या

या स्टेशनवर दरवर्षी अंदाजे 1.27 अब्ज प्रवासी प्रवास करतात. दररोज सुमारे 38 लाख लोक ये-जा करतात. प्रवाशांच्या संख्येनं हे स्टेशन जगातील सर्वाधिक गर्दीचे बनले आहे.

प्रवेशद्वार आणि प्लॅटफॉर्म्स

शिंजुकू स्टेशनवर 200 गेट्स आणि 36 प्लॅटफॉर्म्स आहेत. एखाद्या लहान शहरासारखं विस्तृत, प्रवाशांसाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.

मिनी शहराचा अनुभव

है स्टेशन फक्त ट्रेनसाठी नाही, तर एक मिनी शहरसारखं आहे. शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, रेस्टोरेंट्स आणि भूमिगत मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.

पूर्व आणि पश्चिम भाग

पूर्वेकडचा भाग मनोरंजन, खरेदी आणि गर्दीचा अनुभव देती. पश्चिमेकडे मॉडर्न ऑफिसेस, शांत रस्ते आणि गार्डन्स आहेत. चालत चालत प्रवासी विविध अनुभव घेऊ शकतात.

आकर्षक स्थळे जवळपास

पश्चिमेकडे मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंट बिल्डिंग ऑब्झर्व्हेंटरी आहे. स्वच्छ हवामानात इधून माउंट फुजीचा नजारा पाहायला मिळतो. पर्यटनासाठी आणि फोटोसाठी उत्तम जागा आहे.

मनोरंजनाचे केंद्र

जवळचं काबुकिचो है मनोरंजनाचे प्रसिद्ध केंद्र आहे. इथे अनेक रेस्टॉरेंट्स, बार, क्लब, कराओके आणि चित्रपटगृह आहेत. प्रवाशांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

Rose Gardening Tips: थंडीत 'या' सोप्या टिप्समुळे तुमची गुलाबाची बाग फुलून जाईल!

येथे क्लिक करा