Monsoon Forecast : हवामान खातं नाही, तर 'हा' छोटासा पक्षी सांगतोय यंदा पाऊस कसा होणार; ग्रामीण भागातील पिढ्यान् पिढ्यांचा विश्वास!

बाळकृष्ण मधाळे

विविध संकेतांवरून पावसाचा अंदाज

ग्रामीण भागात पिढ्यान्‌पिढ्या एक समज प्रचलित आहे की, निसर्गातील विविध संकेतांवरून आगामी पावसाचा अंदाज बांधता येतो.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

सुगरण पक्ष्याच्या घरट्यांना विशेष महत्त्व

त्यामध्ये सुगरण (बया) पक्ष्याच्या घरट्यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक शेतकरी आजही सुगरण पक्ष्यांच्या हालचाली आणि घरटे बांधण्याच्या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवतात.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

विणीचा हंगाम

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सुगरण पक्ष्यांचा विणीचा अर्थात घरटे बांधण्याचा हंगाम पावसाळ्याच्या प्रारंभासोबत सुरू होतो.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

सुगरण पक्ष्यांची घरटी बांधण्याची प्रक्रिया

भारतातील बहुतांश भागात हा कालावधी मे ते सप्टेंबरदरम्यान असतो. महाराष्ट्रात विशेषतः जून आणि जुलै महिन्यांत सुगरण पक्ष्यांची घरटी बांधण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे दिसून येते.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

नर पक्ष्यावर घरटे बांधण्याची जबाबदारी

सुगरण पक्ष्यांमध्ये नर पक्षी घरटे बांधण्याची जबाबदारी पार पाडतो. पहिल्या पावसानंतर नर सुगरण गवत, पानांचे तंतू आणि इतर नैसर्गिक साहित्य वापरून अर्धवट घरटे विणण्यास सुरुवात करतो.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न

त्यानंतर तो त्या घरट्यावर बसून विशिष्ट आवाज करत मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. मादीला घरट्याची रचना आणि सुरक्षितता पसंत पडल्यासच ती त्याचा स्वीकार करते. त्यानंतर घरट्याचे उर्वरित बांधकाम पूर्ण केले जाते.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

मादीने घरटे नाकारले तर...

मात्र, मादीने घरटे नाकारल्यास नर सुगरण नवीन घरटे विणण्यास सुरुवात करतो. त्यामुळे एका नर सुगरणाने एकापेक्षा अधिक घरटी बांधल्याचेही अनेकदा आढळून येते.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

सुगरण पक्षी कुठे घरटी बांधतो?

सुगरण पक्षी प्रामुख्याने बाभळींसारख्या काटेरी झाडांवर किंवा विहिरींच्या आसपास असलेल्या उंच झाडांच्या फांद्यांच्या टोकाला लोंबकळणारी घरटी बांधतात. अशा ठिकाणी घरटी बांधल्यामुळे अंडी आणि पिल्लांचे भक्षकांपासून संरक्षण होते.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

चांगल्या पावसाची नांदी

ग्रामीण भागात सुगरण पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर दिसणारी घरटी ही चांगल्या पावसाची नांदी मानली जाते.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

शास्त्रीय आधार काय?

जरी याला शास्त्रीय आधार मर्यादित असला तरी निसर्ग निरीक्षणाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये या पक्ष्याच्या घरट्यांना आजही विशेष महत्त्व दिले जाते.

how baya bird nests predict rainfall

|

esakal

Pigeon Eggs at Home : तुमच्याही बाल्कनीत कबुतराने अंडी दिलीत? मग हे गुपित तुम्हाला माहित असायलाच हवे, अन्यथा होईल मोठे नुकसान!

Pigeon Eggs at Home

|

esakal

येथे क्लिक करा...