Anushka Tapshalkar
गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरु होते. अश्विन महिन्यातल्या नवरात्रीला जसे उपवास धरले जातात तसेच चैत्र नवरात्रीत देखील धरले जातात. परंतु उपवासानंतर पचनसंस्थेवर अनावश्यक ताण येऊ नये म्हणून सावधगिरीने अन्न ग्रहण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पोटाचे त्रास टाळण्यासाठी पुढील टिप्स नक्की फॉलो करा
उपवासानंतर जड जेवण टाळा. हलक्या व लहान प्रमाणातील पदार्थांनी सुरूवात करा. यामुळे पचनसंस्थेला अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी वेळ मिळतो.
पोट रिकामे असल्याने एकदम जास्त पाणी पिणे टाळा. घोटघोट करून पाणी प्या किंवा कोमट पाणी, लिंबूपाणी यासारखे पेय निवडा.
पचायला हलके आणि पोषणमूल्याने भरलेले पदार्थ निवडा. जसे की खजूर, पपई, किंवा संत्री. विविध भाज्यांचे सूप किंवा वाफवलेल्या भाज्या. तसेच दही, ताक यांसारखे पचनप्रक्रीया सुधारणाऱ्या पदार्थांचो सेवन करा.
अशा पदार्थांमुळे पचन बिघडू शकते. सौम्य आणि कमी मसालेदार अन्न खा, जे पोटावर ताण आणणार नाही.
घाईघाईने अन्न गिळण्याऐवजी प्रत्येक घास नीट चावून खा. हे पचन सोपे करते आणि अति खाणे टाळण्यास मदत होते.
दही, ताक किंवा इतर फरमेंटेड पदार्थ खाल्ल्याने पचन सुधारते आणि पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियाला चालना मिळते.
जास्त साखर किंवा प्रक्रिया केलेले अन्न टाळा, कारण यामुळे अचानक ब्लडशुगर वाढते आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. नैसर्गिक व पौष्टिक पदार्थ निवडा.
खाल्यानंतर लगेच शारीरिक हालचाल जसे की व्यायाम करू नका. पचन होण्यासाठी पोटाला वेळ द्या आणि आराम करा.