Aarti Badade
गॅस व पोटफुगीच्या समस्येमागचं खरं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, असंतुलित आहार आणि अपुरी झोप, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.
पोट फुगण्याच्या समस्येवर घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात, विशेषतः जेव्हा ते नियमित आहारात समाविष्ट केले जातात.
अननस हे एक रसाळ फळ असून त्यातील ब्रोमेलेन हे एंजाइम गॅस निर्मिती थांबवून पचनक्रियेला चालना देते.
आले हे जिंजरॉलने समृद्ध असून त्याचा वापर पोटातील जळजळ, गॅस आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो.
केळीमधील पोटॅशियम शरीरातील पाणी संतुलित ठेवते आणि पोट फुगण्यापासून संरक्षण करते.
पपईमधील पपेन नावाचे एंजाइम अन्नाचे जलद पचन घडवते आणि पोट फुगण्याच्या त्रासावर नियंत्रण ठेवते.
काकडीमध्ये भरपूर पाणी आणि कमी सोडियम असते, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि फुगलेपणात लक्षणीय घट होते.
या सर्व नैसर्गिक घटकांचा नियमित आहारात समावेश केल्यास पचनशक्ती सुधारते आणि पोटाशी संबंधित त्रासांपासून कायमचा आराम मिळतो.