Aarti Badade
जो पूर्णपणे बरा न होऊ शकला तरी योग्य आहार, औषधे आणि जीवनशैलीत बदल करून नियंत्रणात ठेवता येतो.
टाइप 1, टाइप 2 आणि गर्भावस्थेतील मधुमेह, यामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असते.
मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले अन्नघटक समाविष्ट करणे आवश्यक असते, जेणेकरून साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हरभरा डाळ ही मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स 28–33 असून ती प्रथिने आणि फायबरने भरलेली असते.
हिरवी मूग डाळ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असून ती पचायला सोपी आहे.
राजमा आणि काळे सोयाबीन यांचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 19 आहे, म्हणून हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आणि पोषणमूल्यांनी युक्त पर्याय आहेत.
मसूर डाळ ही मधुमेह रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे, कारण तिचा GI फक्त 25 असून ती प्रथिने, लोह आणि बी जीवनसत्त्वांनी समृद्ध असते.
चणाडाळ ही मधुमेहासाठी सर्वात सुरक्षित डाळ मानली जाते, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 8 असून ती दररोज खाल्ल्यास साखरेवर चांगले नियंत्रण मिळते.